×

Frequently Asked Questions


परवाना शुल्काची रचना कशी आहे?

"शुल्क रचना खालीलप्रमाणे आहे: जागेचा परवाना शुल्क रू. ५०० ( वार्षिक ). खेळ परवाना शुल्क रु. १०,००० ( एका युनिटकरीता प्रति महिना ) ( एक युनिटमध्ये एका खोलीत जास्तीत जास्त १० टेबल असतील.). "

परवाना मिळवण्याचे शुल्क किती आहे?

शुल्क खालील प्रमाणे आहे. जागेची परवाना शुल्क रु. २०००/-(वार्षिक,) तिकीट विक्री परवाना शुल्क रु. १५ (वार्षिक)

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

परवाना समाप्तीस एक महिन्यापूर्वी आपल्याला परवान्याचे एका प्रतीसह अर्ज करणे आवश्यक आहे; संबंधित पोलीस ठाण्याद्वारे चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.

पासपोर्ट तात्काळ प्राप्त करण्यासाठी किती वेळ लागतो?

यास 1 आठवडा लागेल. (हा प्रश्न क्षेत्रीय पारपत्र कार्यालय, मुंबई यांचेशी संबंधित आहे.)

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे ?

परवान्याच्या समाप्तीस एक महिना अगोदर आपल्या परवान्याच्या प्रतीसह आपल्याला एक अर्ज सादर करावा लागेल. आपल्याला अर्जासह वैध ना हरकत प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. चौकशी संबंधित पोलीस ठाण्यांद्वारे केली जाईल, आणि चौकशी अहवाल मिळाल्या नंतर आपल्याला सूचित केले जाईल.

माझे वडील/नातेवाईक हे वृध्द आहेत. त्यांची ईच्छा आहे की सदरचे शस्त्र माझ्या ताब्यात असावे. याबाबतची नियमावली काय आहे?

"अ" फॉर्ममध्ये शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज करा. परवाना धारकाच्या संमती पत्रासोबत रु. २०/ - मुद्रांक कागदावरील प्रतिज्ञापत्र योग्य नोटरी करून जोडावे. तसेच रु. २०/ - मुद्रांक कागदावर इतर कायदेशीर वारसदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र नोटरी करून जोडावे. बाकी सर्व पध्दत हि नवीन परवाना काढण्यासारखीच आहे. आपणास परवाना दयायचा आहे किंवा नाही हे सर्वस्वी आपल्या पात्रतेवर अवलंबून आहे ना की, देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे.

जर पोलिस ठाण्याचा अहवाल नकारात्मक आहे, तर माझ्या अर्जावर त्याचा काय परिणाम होईल?

अहवाल नकारात्मक असल्यास किंवा इतर कारणांमुळे आपला अर्ज नाकारण्यात आला असल्यास, आपल्याला वैयक्तिक सुनावणी दिली जाईल.

पोलीस ठाण्याचा अहवाल नकारात्मक असल्यास, माझ्या अर्जावर काय परिणाम होईल?

जर अहवाल नकारात्मक आहे किंवा एखाद्या कारणामुळे आपला अर्ज नाकारण्यात आला आहे तर आपल्याला वैयक्तिक सुनावणी दिली जाईल.

जर पोलिस ठाण्याचा अहवाल नकारात्मक आल्यास, माझ्या अर्जावर त्याचा काय निकाल होईल ?

अहवाल नकारात्मक असल्यास किंवा इतर कारणांमुळे आपला अर्ज नाकारण्यात आला असल्यास, तसे आपणांस कळविण्यात येईल.

पोलिस ठाण्याचा अहवाल नकारात्मक असल्यास, माझ्या अर्जावर काय परिणाम होईल?

जर अहवाल नकारात्मक असेल किंवा आपला अर्ज नाकारण्यात आल्यास तर आपणास स्वतः सुनावणीकरीता हजर रहावे लागेल.

नूतनीकरण शुल्क काय आहे?

नूतनीकरण शुल्क परवाना शुल्का इतकेच आहे.

नूतनीकरण शुल्क किती आहे?

परवाना शुल्का इतकेच आहे.

माझा शस्त्र परवाना हा भारतातील दुसऱ्या राज्यातून मला मिळाला आहे. मला माझा परवाना मुंबईमध्ये नूतनीकरण/नोंदणीकृत करून घ्यायचा आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

पुढील प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे

  • १. पुन्हा नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करा.
  • २. शस्त्रास्त्र परवान्याची एक प्रत जोडा.
  • ३. रहिवासी पुरावा तयार / संलग्न करा.
  • ४. मूळ परवानाधारक प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • ५. विभागीय पोलीस उपायुक्त यांच्या टिप्पणी सह पोलिस ठाण्याचा अहवालदेखील आवश्यक आहे. पोलीस उपायुक्त यांच्या कडून नाहरकत प्रमाणपत्र आणि शेरा मिळाल्यानंतर, निर्णय परवाना प्राधिकरणाकडून घेण्यात येईल.

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

परवानाची छायांकित प्रत जोडून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. सदरचा अर्ज हा परवानाचा वैध कालावधी संपण्याच्या एक महिना अगोदर करावा लागतो तसेच स्थानिक पोलीस ठाणे मार्फत अहवाल मागविला जातो त्याबाबत आपणांस कळविण्यात येते.

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

परवाना समाप्तीस एक महिना अगोदर आपल्याला परवान्याचे प्रतीसह अर्ज करणे आवश्यक आहे. आपल्याला अर्जासोबत वैध ना हरकत प्रमाणपत्रे सादर करावे लागतील. संबंधित पोलीस ठाण्यांद्वारे चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

परवान्याची मुदत कालबाह्य होण्याचे एक महिन्यापूर्वी आपणास आपल्या परवान्याच्या प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. सोबत वैध ना हरकत प्रमाणपत्र जोडावी लागतील. संबंधित पोलीस ठाण्यांद्वारे चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.

परवाना नुतनीकरणाकरीता कोणती कार्यपध्दती वापरली जाते?

परवान्याची मुदत कालबाह्य होण्याचे एक महिन्यापूर्वी आपणास आपल्या परवान्याच्या प्रतीसह अर्ज करावा लागेल. सोबत वैध ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. संबंधित पोलीस ठाण्यांद्वारे चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.

माझा परवाना हा मुंबईमध्ये नोंदणीकृत असून तो दुसरीकडे नोंदणीकृत करून घ्यायचा असेल तर त्याबाबतची नियमावली काय आहे?

शस्त्रास्त्र व दारुगोळा शाखा आपल्या विनंती पत्र प्राप्त झाल्यानंतर नवीन नोंदणी प्राधिकार्याकडे ना हरकत प्रमाणपत्र जारी करेल.

नूतनीकरणाचे शुल्क किती आहे?

परवाना शुल्का इतकेच आहे.

परवाना नूतनीकरण शुल्क काय आहे?

नूतनीकरण शुल्क परवाना शुल्का इतकेच आहे.

नूतनीकरण शुल्क किती आहे?

परवाना शुल्का इतकेच आहे.

नूतनीकरण शुल्क किती आहे?

परवाना शुल्का इतकेच आहे.

मला संपूर्ण महाराष्ट्रात माझा परवाना वैध बनवायचा आहे. त्याबाबतची नियमावली काय आहे?

पुढील प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे

  • १. न्यायालय मुद्रांक शुल्क रूं. ५ सह साध्या कागदावर अर्ज करा.
  • २. शस्त्र परवान्याची छायांकित प्रत सोबत जोडावी.
  • ३. आपला अर्ज हा संबंधित पोलीस ठाणे येथे चौकशीसाठी पाठविण्यात येईल.
  • ४. पोलीस ठाणेतून अहवाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • ५. पोलीस ठाणे च्या माध्यमातून तुम्हाला निर्णय लेखी स्वरूपात दिला जाईल.

मला संपूर्ण भारतामध्ये माझा परवाना वैध बनवायचा आहे. त्याबाबतची नियमावली काय आहे?

१. आपल्या अर्जा सोबत परवान्याची छायांकीत प्रत जोडून अर्ज आपण महाराष्ट्र शासन पोल क्रं. ९ गृह खाते, मंत्रालय,मुंबई येथे सादर करावा. आपला अर्ज हा संबंधित पोलीस ठाणे येथे चौकशीसाठी पाठविण्यात येईल.

  • २. आपला अर्ज हा संबंधित पोलीस ठाणे येथे पाठविण्यात येईल.
  • ३. पोलीस ठाणेतून अहवाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • ४. आपली मुलाखत घेऊन सदरचा अहवाल महाराष्ट्र शासनास दिला जाईल. महाराष्ट्र शासन त्याबाबत निर्णय घेईल व तो निर्णय आपणास कळविण्यात येईल.

मला माझे शस्त्र विकायचे आहे. त्याबाबतची नियमावली काय?

पुढील प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे

  • १. न्यायालय मुद्रांक शुल्क रूं. ५ सह साध्या कागदावर अर्ज करा.
  • २. संबंधित कागदपत्रांसह शस्त्र आणि दारुगोळा शाखेला कळवा.
  • ३. सर्व कागदपत्रे क्रमाने असल्यास, विक्री परवाने १५ दिवसांच्या आत दिले जातील.

फटाके विक्रीसाठी परवानगी कशी मिळवावी?

पुढील प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे

  • १.फॉर्म क्र- २४ योग्य प्रकारे भरून जोडावे. अ. दुकान आणि आस्थापना परवाना ब. बृहन्मुंबई महानगरपालिका कडून प्रमाणपत्र. क. जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. ड. अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • २. संबंधित पोलीस ठाणे, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, यांच्याकडून अहवाल विभागीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून पडताळणी अहवाल आणि विशेष शाखा-१ गुन्हे अन्वेषण विभाग व गुन्हे शाखेच्या तांत्रिक शाखेकडून अहवाल शस्त्र आणि दारूगोळा शाखेस प्राप्त होईल

स्फोटक साठवण्यासाठी परवाना प्राप्त कसा करावा?

पुढील प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे

  • १. फॉर्म नं. २३ मध्ये विहित नमुन्यात अर्ज करावा: आवश्यक कागदपत्रे- अ. ना हरकत प्रमाणपत्र सह ठेकेदार यांचा करार. ब. उत्स्फोटनाच्या प्रयत्नासाठी जमीनमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. क. स्फोटक परवाना संग्रह व स्फोटक वाहतूक परवाना. ड. अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • २. संबंधित पोलीस ठाणे, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, यांच्याकडून अहवाल विभागीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून पडताळणी अहवाल आणि विशेष शाखा-१ गुन्हे अन्वेषण विभाग व गुन्हे शाखेच्या तांत्रिक शाखेकडून अहवाल शस्त्र आणि दारूगोळा शाखेस प्राप्त होईल.

रस्ता परवानासाठी मी अर्ज कसा करू शकेन?

खालील कागदपत्रे सादर करा:

  • १. रु. ५/ - न्यायालयीन शुल्क मुद्रांक
  • २. शस्त्र परवानाची छायांकीत प्रत.
  • ३. खरेदी / विक्री पावती ४. रु. २०/ - शुल्क.

पुन्हा नोंदणीसाठी काय प्रक्रिया आहे?

विहित नमुन्यातील अर्जासह रेशन कार्ड, टेलिफोन बिल, परवान्याची छायांकीत प्रत इ. कागदपत्रे सादर करा. शस्त्र आणि दारुगोळा शाखेद्वारे पुढील अहवाला प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो:-

  • १. मूळ परवानाधारकांकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • २. विभागीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून अर्जदाराची चौकशी अहवाल
  • ३. पडताळणी अहवाल.
  • ४. तांत्रिक विभाग कडून अहवाल
  • ५. विशेष शाखा-१ गुन्हे अन्वेषण विभाग कडून अहवाल

कोणत्या प्रकरणांमध्ये निलंबन/निरस्तीकरण होऊ शकते?

संबंधित पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे, शस्त्रास्त्र परवान्याचे निलंबन/निरस्तीकरण शक्य आहे.