×

Frequently Asked Questions


जागेच्या अनुकूलतेची खात्री करण्यासाठी कोणती चौकशी केली जाते?

संबंधित / स्थानिक पोलीस ठाण्याकडून खालील मुद्द्यांवर चौकशी करण्यात येईल:

  • १. अर्जदाराने सादर केलेली माहिती बरोबर आहे का ?
  • २. मंडळाच्या विरोधात जनतेच्या कोणत्याही तक्रारी आहेत का ?
  • ३. कोणत्याही शाळा, महाविद्यालय, बालवाडी, रुग्णालय, मंदीर किंवा धार्मिक स्थळ ७५ मीटरच्या परिसरामध्ये आहे का ?
  • ४. अश्याच प्रकारचा क्लब ७५ मीटरच्या परिसरात आहे का ?
  • ५. परवाना मंजूर झाल्यास कायदे आणि सुव्यवस्था समस्या उद्भवू शकते ?
  • ६. आस्थापना हा संकुचित परिसरात वसलेले आहे का, जे प्रामुख्याने एक निवासी क्षेत्र आहे.
  • ७. पोलीस परवाना प्राप्त करण्यासाठी अर्जदार हा योग्य व्यक्ती आहे का ?
  • ८. पोलीस परवाना प्राप्त होण्यासाठी जमीनीची अनुकूलता आहे का ?
  • ९. अर्जदार / क्लबचे मालकाचा चारित्र्य पडताळणी पोलीस ठाणे, विशेष शाखा -१, गु.अ.वि., आणि गुन्हे शाखेचे तांत्रिक शाखा यांच्या सरकारी दस्तऐवजावरून सत्यापित केले पाहिजे.
  • १०. आस्थापनामधील खोल्यांची संख्या.
  • ११. प्रत्येक खोलीत टेबलाची संख्या.
  • १२. प्रत्येक टेबलावर बसलेल्या व्यक्तींची संख्या.

अनुकूल जागेसाठी कोणकोणत्या गोष्टींची चौकशी केली जाते ?

संबधित/स्थानिक पोलीस ठाणे चौकशी करते

  • १. जागेच्या जवळ कोणते ठिकाण आहे.
  • २. सदरच्या जागेचा आवार हा ४० चौ. मी.पेक्षा जास्त आहे का?
  • ३. सदरची जागा ही इमारतीमध्ये तळ मजल्यावर आहे का?
  • ४. पडदा हा जागेच्या आवराच्या बाहेरून बघू शकतो का?
  • ५. संबंधित परिसराच्या बाहेर आवाज जातो का?
  • ६. छप्पर व मजला यांच्यामधील अंतर
  • ७. एका वेळी बसण्याची क्षमता.
  • ८. पडदा व पहिली रांग यामधील अंतर १.८० मीटर आहे का?
  • ९. जर दुरचित्रवाणी किंवा पडदा हे ५१ सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर का?
  • १०. मुडपल्या जाणाऱ्या खुर्च्या मजल्यावर घट्ट बसवल्या आहेत का?
  • ११. खुर्च्याच्या दोन ओळींच्या मधील अंतर ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे का?
  • १२. सर्वात शेवटच्या रांगेत बसलेल्या व्यक्तीला पडदा दिसतो का?
  • १३. पंखे / एसीची व्यवस्था उपलब्ध आहे का?
  • १४. बाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी वेगळा दरवाजा आहे का?
  • १४. बाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी वेगळा दरवाजा आहे का?

परवाना शुल्क संरचना काय आहे?

शुल्क:

  • १. सिनेमा परवाना - रु २०० पर्यंत जागा रु. २,०००/-.; ५०० पर्यंत जागा रु.३,०००/-.; ५०१ पेक्षा अधिक जागा ४,५००/-.
  • २. तिकीट विक्री परवाना रु. ५००.
  • ३. परवाना अंतर्गत बदल / फेरबदल. रु. २५.
  • ४. नक्कल परवाना रु. ५०.

या प्रक्रियेस किती कालावधी लागेल?

या प्रक्रियेस सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्याच्या तारखेपासून किमान ३० ते ४५ दिवस लागतील.

पत्त्यामध्ये बदल करण्याकरीता कोणती कार्यपध्दती आहे?

नवीन पत्ता नमूद करून नवीन ऑनलाईन पारपत्र अर्ज सादर करण्यात यावा.

प्रक्रिया किती काळ घेईल?

सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या तारखेपासून प्रक्रिया किमान ३० ते ४५ दिवस घेईल.

मनोरंजन / जल उद्यान परवान्याच्या नूतनीकरणासाठी काय प्रक्रिया आहे?

अर्जदाराने परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे / नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.:

  • अ. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • ब. विद्युत निरीक्षकांकडून नाहरकत प्रमाणपत्र
  • क. आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडून नाहरकत प्रमाणपत्र
  • ड. एमटीएनएलचे प्रमाणपत्र.
  • ई. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • फ. जिल्हाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र

मालमत्ता संरक्षणासाठी मी शस्त्र परवाना कसा मिळवू शकतो?

शस्त्र परवाना मालमत्ता संरक्षणसाठी भेटू शकतो मात्र प्री-प्रो आधारे. नवीन परवाना काढण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच पध्दतीने मिळेल.

एफएल-३ व एफएल-४ काय आहे आणि ते कसे प्राप्त होते?

एफएल-३ व एफएल-४ परवाने उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडून जारी करण्यात येतात.

कोणत्या नियमानुसार तुम्ही परवाना देतात आणि कोणती कागदपत्रे गरजेची आहेत?

सार्वजनिक मनोरंजनाची जागा ( सिनेमा व्यतिरिक्त ) आणि मेळे, तमाशा धरुन सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग यांना परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे याबाबत नियम १९६० व सुधारित नियम २००६.

कोणत्या नियमां अंतर्गत आपण परवाना जारी करता आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?

सार्वजनिक जागृतीसाठी (सिनेमांव्यतिरिक्त) परवाने व नियंत्रण आणि मेळा व तमाशा यांसारख्या सार्वजनिक मनोरंजनासाठी कार्यप्रणाली १९६०.

कोणत्या नियमांनुसार परवाना दिलेला आहे आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

मेला आणि तमाशा सारख्या सार्वजनिक मनोरंजनासाठी (सिनेमा वगळून) परवाने यांचे नियम आणि नियंत्रण १९६०

आपण कोणत्या नियमांच्या अंतर्गत परवान्यांसाठी आवश्यक कागदपत्रे जारी केली आहेत?

महाराष्ट्र सिनेमा (नियमन) नियम १९६६.

परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

परवान्याच्या नूतनीकरणासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल

  • १. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • २. विद्युत निरिक्षकांकडून नाहरकत प्रमाणपत्र.
  • ३. आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडून नाहरकत प्रमाणपत्र
  • ४. एमटीएनएल कडून प्रमाणपत्र
  • ५. प्रकाशयोजना कंत्राटदाराचे प्रमाणपत्र.
  • ६. मुख्य अग्निशमन अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका कडून ना हरकत प्रमाणपत्र.
  • ७. वाहतूक पोलिसांकडून पार्किंगविषयी ना हरकत प्रमाणपत्र.
  • ८. मान्यताप्राप्त चित्रपटांची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र
  • ९. जिल्हाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र.

परवाना शुल्क रचना काय आहे?

ध्वनिक्षेपक कंत्राटदार परवाना शुल्क खालीलप्रमाणे आहे:

  • प्रति वर्ष रू. २५००.
  • नूतनीकरण शुल्क रू. २५०० प्रति वर्ष.

पडताळणी करीता कोणती कार्यपध्दती वापरली जाते?

पडताळणीसाठी पुढील प्रक्रिया केली गेली

  • १) सर्वप्रथम पारपत्र आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्या अर्जात वर नमूद केली पारपत्र सेवा केंद्रावर संबधित विहित कागदपत्रे सादर करण्यात येतात.
  • २) सदर अर्ज पोलीस ठाण्याकडून आॅनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यात येतात.
  • ३) सदर अर्जाची एक प्रत काढून बीट अंमलदारास देण्यात येते. पारपत्र अर्जदाराने पत्त्यावर पोलीस ठाणेतील बीट अंमलदार जाऊन टॅबवर पारपत्र अर्जदाराचा सही व वास्तव्यबाबतची पडताळणी करतो.
  • ४) टॅबवरील पडताळणी झाल्यानंतर पारपत्र अर्जदारास पारपत्र पडताळणी अंमलदारांकडे २ ते ३ दिवसात पारपत्र सेवा केंद्र येथे सादर केलेली व इतर कागदपत्रे (मूळ व त्याच्या छायांकित प्रती) पडताळणीकरीता पोलीस ठाण्यास हजर रहावे लागते.
  • ५) कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर सदर अर्ज पारपत्र पडताळणी अहवालासह आॅनलाईन पध्दतीने पारपत्र शाखा-२ येथे पाठविण्यात येतात.
  • ६) विशेष शाखा-२ येथे पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी पुन्हा पारपत्र अर्जाची छाननी करून सदर अज आॅनलाईन पध्दतीने पारपत्र कायालय यांना सादर करतात.
  • ७) सदर प्रकिया पूर्ण झाल्यानंतर क्षेत्रीय पारपत्र कार्यालय यांच्याकडून अर्जदारास पारपत्र प्राप्त होतो. पडताळणी प्रकिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास पारपत्रा संबंधी काही शंका असल्यास क्षेत्रीय पारपत्र कार्यालयास संपर्क साधावा

परवाना शुल्क संरचना काय आहे?

"शुल्क संरचना खालीलप्रमाणे आहे. जागेचा परवाना शुल्क रु. ५०० प्रति मशीन / प्रति लेन (दरमहा) तिकीट विक्री शुल्क रु. ५०० प्रत्येक वर्षी खेळ परवाना शुल्क रु.१०,०००/- प्रति अले / दरमहा (हे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याद्वारे जमा केले जाईल)."

मनोरंजन / जल उद्यान परवान्याच्या नूतनीकरणावर प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागतो?

या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे

माझे वडील/काका/पती/नातेवाईक परवानाधारक होते. ते आता मयत झाले आहेत त्यांच्यांकडचा परवाना माझ्याकडे आहे. तरी मी आता काय करू?

तुम्ही तुमच्याकडील शस्त्र व शस्त्र परवाना सोबत दारूगोळा जवळच्या पोलीस ठाणे येथे जमा करावा. मृत्यू प्रमाणपत्राचा दाखल्याची छायांकीत प्रत लेखी अर्जासोबत जोडावा. सुरक्षित ताब्यात दिल्याबाबतची पावती आपल्याला दिली जाईल. सदर शस्त्र व दारूगोळा एक वर्ष ठेवला जाईल. शुल्क रू. ५०/ - एक वर्षासाठी आकारले जातील.

प्रक्रियेला किती वेळ लागतो?

सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दिलेल्या दिनांकापासून ३० ते ४५ दिवस लागतात.

या प्रक्रियेस किती कालावधी लागेल?

सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या तारखेपासून या प्रक्रियेस किमान ३० ते ४५ दिवस लागू शकतील.

प्रक्रियेला किती वेळ लागतो?

प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यापासून कमीतकमी ९० दिवस लागतील.

या कार्यपध्दतीला किती वेळ लागतो?

सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या तारखेपासून प्रकियेस किमान ३० ते ४५ दिवस लागू शकेल.

नूतनीकरण शुल्क काय आहेत?

नूतनीकरण शुल्क संरचनेप्रमाणेच आहे.

पोलिस ठाण्याचा अहवाल नकारात्मक असेल, तर काय माझ्या अर्जावर परिणाम होईल?

अहवाल नकारात्मक असल्यास किंवा आपला अर्ज नाकारण्यात आला असेल तर आपल्याला वैयक्तिक सुनावणी दिली जाईल.

इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड स्टॅम्प (इ. सी. एन. आर.) या वर्गवारीत कोणते अर्जदार येतात?

पारपत्र अर्जदार ज्याचे शिक्षण १० वी पेक्षा जास्त आहे, असे सर्व अर्जदार इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड स्टॅम्प (ECNR) या वर्गवारीत येतात.

पोलिस ठाण्याचा अहवाल नकारात्मक असल्यास, माझ्या अर्जावर काय परिणाम होईल?

जर अहवाल नकारात्मक आहे किंवा काही कारणास्तव आपला अर्ज नाकारण्यात आला आहे तर आपल्याला वैयक्तिक सुनावणी दिली जाईल.

नातेवाईक मृत व्यक्तीचे शस्त्र धारण करण्याची इच्छा व्यक्त करतो. प्रक्रिया काय आहे?

आपण नवीन परवान्यासाठी अर्ज ‘‘अ’’ हा भरून सादर करावा. सोबत आपण मृत्यूपत्राची छायांकित प्रत व सुरक्षित ताब्यात ठेवल्याची न्यायालय मुद्रांक शुल्क रूं.२०/ - जोडून नोटरी करावी. अर्जदाराने ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या सर्व कायदेशीर वारसांच्या प्रतिज्ञापत्रासह संलग्न करणे आवश्यक आहे. बाकी सर्व प्रक्रिया ही नवीन परवाना मिळविण्याच्या प्रमाणे समान आहे.

परवाना शुल्काची रचना कशी आहे?

शुल्क रचना खालीलप्रमाणे आहे: जागेचे परवाना शुल्क रू. १००० प्रति मशीन / कार्ट प्रति (प्रतिवर्ष). तिकीट विक्री शुल्क रू. ३०० दर वर्षी. खेळ परवाना शुल्क रु. ५००/- प्रति दिन(हे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेकडून संकलित केले जाईल.)

परवाना शुल्क संरचना काय आहे?

शुल्क संरचना खालीलप्रमाणे आहे. जागेचा परवाना शुल्क रु. ५०० प्रति टेबल (दरमहा). तिकीट विक्री शुल्क रु. ५०० प्रति वर्ष. खेळ परवाना शुल्क रु.२५०/- प्रति टेबल/ प्रती दिन (हे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याद्वारे जमा केले जाईल).